क्रीडा संकुलात स्वच्छतेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:43+5:302021-09-04T04:24:43+5:30
व्हॉलीबॉलच्या मैदानावर वाढले गवत... संकुलातील व्हॉलीबॉलच्या मैदानावरही मोठ्या प्रमाणात गाजर-गवत वाढले आहे. अनेक क्लबचे खेळाडू सरावास या ठिकाणी येतात. ...
व्हॉलीबॉलच्या मैदानावर वाढले गवत...
संकुलातील व्हॉलीबॉलच्या मैदानावरही मोठ्या प्रमाणात गाजर-गवत वाढले आहे. अनेक क्लबचे खेळाडू सरावास या ठिकाणी येतात. गवत वाढल्याने व आर्द्रतेने व्हॉलीबॉल भिजून खराब होत आहेत. त्यामुळे व्हॉलीबॉल मैदानाची स्वच्छता करावी, अशी मागणी व्हॉलीबॉल खेळाडूंमधून होत आहे.
स्वच्छतागृहात दुर्गंधी...
क्रीडा संकुलात फिरावयास येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना नाकाला रुमाल बांधावा लागत आहे. वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. नियमित स्वच्छतागृहाची साफसफाई व्हावी व तेथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा आहे.
शुल्क घेऊनही सुविधांकडे दुर्लक्ष...
क्रीडा संकुल समितीच्या वतीने फिरावयास येणाऱ्या नागरिकांकडून प्रवेशासाठी १ रुपया घेण्यात येतो. हा खर्च संकुल समिती स्वच्छता व दुरुस्तीसाठी खर्च करते. मात्र, पैसे घेऊनही स्वच्छता व सुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. संकुल परिसर नियमित झाडला जात नाही. वॉकिंग ट्रॅकसह स्वच्छतागृह स्वच्छ केले जात नाही.