मी माणसे जोडली अन् माणुसकीची जोड दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:04+5:302021-09-27T04:21:04+5:30

उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रा. सुरेश पुरी यांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ...

I added people and added humanity | मी माणसे जोडली अन् माणुसकीची जोड दिली

मी माणसे जोडली अन् माणुसकीची जोड दिली

Next

उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रा. सुरेश पुरी यांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीरला माहिती विभागाचे उपमाहिती कार्यालय व पत्रकार भवन लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांनी केले. यावेळी शोध व उत्कृष्ट वार्ता गटातील शंकर बिराजदार, हणमंत केंद्रे, बापू नाईकवाडे, अविनाश काळे, विनोद गुरमे, ज्योतिराम पांढरपोटे या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. शिवशंकर पटवारी, प्रवीण मेंगशेट्टी, बसवराज पाटील नागराळकर यांनी मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले. कार्यक्रमास औरंगाबादचे माहिती सहायक डॉ. श्याम टरके, सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी शिवाजी इंद्राळे, डॉ. नागनाथ कुंटे, राजेंद्र सूर्यवंशी, गोव्याच्या रजनी नाईक-धानुरे, राजीव धानुरे, नारायण गोस्वामी, विठ्ठल कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी तर आभारप्रदर्शन दयानंद बिरादार यांनी केले.

Web Title: I added people and added humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.