लातुरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले; पाच महिन्यात १ हजार ७४६ गुन्हे दाखल

By राजकुमार जोंधळे | Published: April 20, 2023 05:49 PM2023-04-20T17:49:31+5:302023-04-20T17:49:55+5:30

लातूर पोलिसांचा हिसका; सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Illegal business drivers scares in Latur; 1 thousand 746 cases registered in five months | लातुरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले; पाच महिन्यात १ हजार ७४६ गुन्हे दाखल

लातुरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले; पाच महिन्यात १ हजार ७४६ गुन्हे दाखल

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांना झटका देत लातूर पोलिसांनी गत पाच महिन्यात विविध पोलिस ठाण्यात तब्बल १ हजार ७४६ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण २ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २० ऑक्टोबर २०२२ मध्ये पदभार स्वीकारला. तर गत पाच महिन्यात त्यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली. दरम्यान, अवैध व्यवसायाची माहिती थेट आपल्या मोबाईलवर, व्हाट्सएपवर द्या, असे नागरिकांना जाहीर आवाहन केले. त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबरच नागरिकांना देऊन टाकला. यातून प्राप्त तक्रारी, माहितीच्या आधारे तातडीने विशेष पथकांनी अवैध व्यवसायावर छापा टाकला आहे. ही कारवाई मार्चअखेरची असून, जिल्ह्यातील विविध २३ पोलीस ठाण्यात तब्बल दोन हजार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत २ कोटी ९ लाख ८२ हजार २७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

असे आहेत विविधस्वरूपाचे गुन्हे दाखल ...
गत पाच महिन्याच्या कालावधीत दारूबंदी कायद्याअंतर्गत १ हजार ३६१ गुन्हे, जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत ३४९ गुन्हे, प्रतिबंधित गुटखा विक्री व्यवसाय अंतर्गत ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तक्रार करणाऱ्याचे नाव ठवले जाते गोपनीय..
पोलिस अधीक्षक मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी स्वतःचा खाजगी मोबाईल क्रमांक जाहीर केला. या मोबाईल क्रमांकावर अवैध धंद्याची माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. मिळालेल्या महितीनंतर तातडीने छापा मारला जातो. 

५४ हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई...
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होऊ न देता वाहतूक सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यावरही तोडगा काढत पोलीस अधीक्षकांनी वाहन चालकांमध्ये वाहतूक जनजागृती केली. वाहतूक शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५३ हजार ९७१ वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करत १ कोटी २१ लाख १० हजार ६९० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Web Title: Illegal business drivers scares in Latur; 1 thousand 746 cases registered in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.