शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवैध वृक्षतोड वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:35+5:302021-01-13T04:49:35+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगावसारखे मोठे प्रकल्प असल्याने परिसरासह तालुक्यातील दैठणा, शेंद, साकोळ, तळेगाव, धामणगाव, ...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगावसारखे मोठे प्रकल्प असल्याने परिसरासह तालुक्यातील दैठणा, शेंद, साकोळ, तळेगाव, धामणगाव, शिरूर अनंतपाळ येथे मोठ्या प्रमाणात वनराई निर्माण झाली आहे; परंतु वनविभागाच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला असून, प्रदूषणाचा धोका अधिकच वाढत चालला आहे. परिणामी तालुक्यातून होणाऱ्या अवैध वृक्षतोडीला वेळीच आळा घातला नाही तर त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहतुकीसाठी सूर्यास्तानंतरची वेळ...
दिवसभर अवैध वृक्षतोड केली जात असून, तोडलेल्या वृक्षांची वाहतूक करण्यासाठी सोयीची म्हणजे सूर्यास्तानंतरची वेळ निवडली जात आहे. सूर्यास्त झाला की विविध मार्गांनी ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक आदी वाहनांची रवानगी केली जात आहे. ( वन विभागाकडून कारवाई होणार....)
तालुक्यातील अवैध वृक्षतोडीबाबत वन विभागाचे तालुका क्षेत्रीय अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली असून, लवकरच दंडात्मक कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.
फाेटाे ओळी / अवैध वृक्षतोड वाढली...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवैध वृक्षतोड केली जात असून, सूर्यास्तानंतर लाकडाची विविध मार्गांनी वाहतूक केली जात आहे.