बँकेच्या नावे आलेल्या फोनबाबत सावधान;क्रेडिट कार्ड, ओटीपीची विचारत शिक्षकाचे १ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 01:55 PM2022-02-16T13:55:20+5:302022-02-16T13:55:20+5:30
बॅंकेच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षकाला घामच फुटला.
लातूर : क्रेडिट कार्ड आणि ओटीपी विचारत अहमदपूर येथील एका शिक्षकाच्या बॅक खात्यातून दाेनदा एकूण ९७ हजार ६९८ रुपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने लंपास केल्याची घटना १४ फेब्रुवारी राेजी घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातील माकणी (ता. गंगाखेड) येथील नरसिंग प्रभाकर शेंडगे (५२) हे सध्याला अहमदपूर शहराला वास्तव्याला आहेत. त्यांच्या माेबाईल क्रमांकावर एका अनाेळखी माेबाईल क्रमांकावरून साेमवार, दि. १४ फेब्रुवारी राेजी फाेन आला. समाेरून बाेलणाऱ्या व्यक्तीने सांगितले, मी एसबीआय बॅक शाखा, अहमदपूर येथून बाेलत आहे. आपल्या क्रेडिट कार्डबाबत माहिती सांगा असे म्हणाले. यावेळी शिक्षक शेंडगे यांनी माहिती दिली. त्यानंतर तुमच्या माेबाईलवर आलेला ओटीपी नंबर सांगा असे म्हणतातच, नरसिंग शेंडगे यांनी दाेन वेळेस त्यांना ओटीपी नंबर सांगितला. या दाेन्ही वेळी समाेरच्या व्यक्तीने त्यांच्या बॅक खात्यातून पहिल्यावेळी ४८ हजार ८४९.६० आणि दुसऱ्यांदाही ४८ हजार ८४९.६० असे एकूण ९७ हजार ६९६ रुपये इतकी रक्कम परस्पररीत्या अन्य खात्यातून वर्ग करून फसवणूक केली.
बॅंकेच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षक शेंडगे यांना घामच फुटला. त्यांनी तातडीने बॅकेशी संपर्क साधला. त्यानंतर अहमदपूर पाेलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. अधिक तपास पाेलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ करीत आहेत.