खाण्याचा सोडा वापरुन घरच्या घरी करा गणेशमूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:19+5:302021-09-04T04:24:19+5:30
पीओपीच्या मूर्तीचीच अधिक विक्री... शाडू मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक असतात. भडक रंग ...
पीओपीच्या मूर्तीचीच अधिक विक्री...
शाडू मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक असतात. भडक रंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चमक असलेल्या या मूर्तीचीच जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक विक्री झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारात गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल होत आहेत.
असे असावे खाण्याच्या सोड्याचे प्रमाण...
मूर्तीची उंची पाण्याचे प्रमाण लि. खाण्याचा सोडा किलो
७ ते १० इंच १५ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६
४८ तासांत विरघळते मूर्ती...
घरच्या बादलीत पाणी घेऊन त्यात खाण्याचा सोडा सोडून पूर्ण विरघळावा. निर्माल्य व सजावटीचे साहित्य बाजूला काढून केवळ मूर्ती पाण्यात विसर्जित करावी. दर दोन ते तीन तासांनी हे मिश्रण ढवळावे. ४८ तासांत मूर्ती विरघळते. प्लास्टिक पेटंचा थर मूर्तीच्या बाजूला केल्यास लवकर विरघळण्यास मदत होते.
कोरोनामुळे विक्रीत घट...
पीओपीपासून तयार होणाऱ्या गणेशमूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करता येणे शक्य आहे. विशेषत: संपूर्ण कुटुंबीयासह लाडक्या गणरायाला डोळ्यादेखत निरोप दिला जात असल्याने भावना व परंपरा या दोन्ही बाबी साध्य होतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - मूर्तिकार, लातूर
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर...
मूर्ती विरघळून तयार झालेल्या पाण्यात अमोनियम सल्फेट असते. त्यात समप्रमाणात पाणी मिसळून त्याचा झाडांना खत म्हणून वापर करता येतो.
झाडाच्या एका कुंडीमध्ये ५०० मि. ली. तर मोठ्या झाडांना प्रत्येकी दोन लीटर पाणी देता येते. यामुळे झाडांची वाढ होण्याबरोबरच रंग आकर्षक होतो.