अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार
By संदीप शिंदे | Published: January 19, 2024 08:03 PM2024-01-19T20:03:14+5:302024-01-19T20:04:22+5:30
ही कलाकृती साकारण्यासाठी शंभराहून अधिक कलाकार १४ जानेवारीपासून कार्यरत होते.
अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील निजवंतेनगर येथे खा. सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारातून पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये भव्य-दिव्य अशी प्रभू श्रीराम दरबाराची पणत्यांच्या सहाय्याने कलाकृती साकारण्यात आली आहे. त्यासाठी दोन लाख तीस हजार पणत्यांचा उपयोग करण्यात आला आहे.
ही कलाकृती साकारण्यासाठी शंभराहून अधिक कलाकार १४ जानेवारीपासून कार्यरत होते. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या कलाकृतीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोबतच भव्य एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. प्रभू श्रीराम यांचा दरबार पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये २ लाख ३० हजार पणत्यांचा उपयोग करून प्रभू श्रीराम दरबार साकारण्यात आला आहे. याचे ठळक वैशिष्ट्य:
1)15,000 स्क्वेर फूट मध्ये भव्य-दिव्य कलाकृती
2)भव्य कलाकृतीसाठी दोन लाख तीस हजार पणत्यांचा वापर
3)22 तारखेला सकाळी 11:00 वाजता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होणार
4)सध्या 100 कलाकार ह्या कलाकृती साठी आहेत
5)5000 हैड्रोजन फुग्यांचा वापर
6)अहमदपूर नगरीत प्रथमच होणार अर्धा तास भव्य आतिषबाजी
7)मुख्य कलाकार -चेतन राऊत (मुंबई)
8)14 जानेवारी पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे
9)मोठ्या एलईडी स्क्रीन वर लाईव्ह स्क्रीनिंग अयोध्या मंदिर