किनगावात ६२ वर्षीय सुमित्राबाई वाहुळे पाहणार गावचा कारभार

By हरी मोकाशे | Published: December 20, 2022 07:09 PM2022-12-20T19:09:27+5:302022-12-20T19:09:39+5:30

किनगाव परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व

In Kingaon, 62-year-old Sumitrabai Vahule will look after the village administration | किनगावात ६२ वर्षीय सुमित्राबाई वाहुळे पाहणार गावचा कारभार

किनगावात ६२ वर्षीय सुमित्राबाई वाहुळे पाहणार गावचा कारभार

googlenewsNext

किनगाव (लातूर) : अहमदपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या किनगाव येथे तिरंगी लढत झाली होती. एकूण ५७ उमेदवार आपले नशीब अमावित होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, निकाल जाहीर होताच विठ्ठलराव बोडके यांच्या नेतृत्वाखालील किनगाव परिवर्तन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केल आहे. सरपंचपदासह १५ सदस्य बोडके यांच्या पॅनलचे विजयी झाले आहेत.

किनगाव ग्रामपंचायत १७ सदस्यांची असून सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गाीतल महिलेसाठी राखीव होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत रिपाइं (आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे यांच्या मातोश्री सुमित्राबाई एकनाथराव वाहुळे विजयी झाल्या आहेत. सदस्य पदाची माळ विठ्ठलराव बोडके, निजाम महेबूब शेख, निजाम घुडूलाल कुरेशी, धनराज बोडके, बसंतीबाई वैजनाथ दहिफळे, तारामती तुकाराम आमले, शिलाबाई महादेव इंदुलकर, गोदावरी ज्ञानोबा देवदे, मुमताज शब्बीर शेख, शुभम मुंढे, मंगल चंद्रकांत शिलगिरे, मिनाबाई बाबुराव चाटे, चंद्रप्रकाश हंगे, ताहेराबी खाजामियाँ तांबोळी, ललिता दादाराव कांबळे यांच्या गळ्यात पडली आहे. विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: In Kingaon, 62-year-old Sumitrabai Vahule will look after the village administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.