रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Published: June 20, 2023 08:18 PM2023-06-20T20:18:32+5:302023-06-20T20:19:08+5:30

घडल्या प्रसंगाचे फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी .

In Latur Assault on a married woman at the threat of a revolver; A case has been registered against both | रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लातूर : रिव्हॉल्व्हर आणि काेयत्याचा धाक दाखवत एका ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना औसा तालुक्यातील किल्लारी येथे घडली. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आराेपीला अटक करण्यात आली असून, दुसरा आराेपी फरार झाला आहे.

पाेलिसांनी सांगितले, किल्लारी येथील एका महिलेवर कारमध्ये गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची घडली असून, घडल्या प्रसंगाचे फोटो काढून तुझ्या भावाला, भावजयीला आणि मुलांच्या मोबाइलवर पाठवतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, घरासह अन्य ठिकाणी नेऊन तिच्यावर सतत बलात्कार केला. त्याचबराेबर शिवीगाळ करून जबर मारहाण केली. घरातील कपाटाचा आरसा फोडून नुकसान केले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कोयता मानेवर ठेवत घरात घुसून कपाटातील तीन लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यातील आरोपीला दुसऱ्या एका आराेपीने मदत केली. ही घटना ३ सप्टेंबर २०२२ ते १६ जून २०२३ दरम्यान घडली.

याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विक्रम लालू जाधव (रा. आनंदवाडी तांडा, ता. औसा) आणि अरुण लक्ष्मण बाबळसुरे (रा. किल्लारी) या दाेघांविराेधात गु.र.नं. १५६ / २०२३ कलम ३७६ (२) (एन), ४५२, २९४, ३९२, ४२७, १०९, ३२३, ५०६, ३४ भादंवि सहकलम ३/२५ भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आराेपीला पाेलिसांनी अटक केली असून, दुसरा आराेपी फरार झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक ढोणे करीत आहेत.

 

Web Title: In Latur Assault on a married woman at the threat of a revolver; A case has been registered against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.