लातुरात एकाच रात्री बंद घरे फोडली; सात लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: November 12, 2022 06:14 PM2022-11-12T18:14:09+5:302022-11-12T18:14:19+5:30
घरफाेडीचे सत्र सुरूच : उदगीरातही चाेरट्यांनी घर फाेडले
लातूर : शहरासह उदगीरमध्येही चाेरट्यांनी बंद घरे फाेडून साेन्याचे दागिने असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना एकाच रात्री घडली आहे. याबाबत लातूर येथे एमआयडीसी आणि उदगीर पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातूर शहरात बंद घरफाेड्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. हे घरफाेड्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विकासनगर भागात वास्तव्याला असलेले दाेघे जण पुण्याला गेले हाेते. दरम्यान, इकडे चाेरट्यांनी त्यांच्या बंद घरावर नजर ठेवून ते फाेडले. कपाटामध्ये ठेवलेले ३४ ताेळे वजनाचे दागिने (किंमत ६ लाख ९६ हजार रुपये) लंपास केले. एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विकासनगर येथील वसंत एकनाथ गायकवाड (रा. जांब बुृ. ता. मुखेड, जि. नांदेड) हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, बंद असलेले घर फाेडून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवण्यात आलेले ३० ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने आणि त्यांच्या शेजारी असलेल्या घरातील ६९ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ९६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफाेड्या थांबता थांबेनात...
दिवाळीपूर्वी लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर घरफाेडी, चाेरीच्या घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या आयकर विभागाचे अधिकारी आहाेत, अशी बतावणी करून दहा लाखांची राेकड पळविली. शिवाय, धमकावत, दिशाभूल करत हातातील माेबाइल हिसकावून पळ काढण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. दरम्यान, यातील काही आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे.
उदगीरातही दीड लाखाची घरफाेडी...
उदगीर शहरातील फुले नगरात घर फाेडून जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादी तेजाबाई व्यंकटराव जाधव (रा. फुले नगर, उदगीर) यांचे बंद घर फाेडून, कपाटाची माेडताेड करून राेख ७० हजार आणि दागिने असा एकूण १ लाख ५१ हजार ४० रुपयांचा ऐवज पळविला आहे. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.