लातुरात ई-केवायसीकडे शेतकऱ्यांची पाठ; मुदत संपत आली तरी १ लाख लाभार्थी ई-केवायसीविना !

By हणमंत गायकवाड | Published: August 25, 2022 01:59 PM2022-08-25T13:59:26+5:302022-08-25T14:00:45+5:30

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र मार्फत बायोमेट्रिक पद्धतीने ई- केवायसी करण्यात येत आहे.

In Latur Farmers neglect to e-KYC; 1 lakh beneficiaries without e-KYC even if the deadline expires! | लातुरात ई-केवायसीकडे शेतकऱ्यांची पाठ; मुदत संपत आली तरी १ लाख लाभार्थी ई-केवायसीविना !

लातुरात ई-केवायसीकडे शेतकऱ्यांची पाठ; मुदत संपत आली तरी १ लाख लाभार्थी ई-केवायसीविना !

Next

लातूर: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ई- केवायसी प्रमाणिकीकरण करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात ३ लाख १४ हजार ५८८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.त्यापैकी १ लाख ९६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १ लाख १७ हजार ७२२ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. 

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र मार्फत बायोमेट्रिक पद्धतीने ई- केवायसी करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात पी.एम. किसान योजनेसाठी ३ लाख १४ हजार ५८८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी १ लाख ९६ हजार ८१६ शेतकऱ्यांनी ई- केवायसी करून घेतलेली आहे. मात्र १ लाख १७ हजार ७२२ शेतकऱ्यांचे इ केवायसी प्रमाणीकरण शिल्लक आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत या शेतकऱ्यांनी ई- केवायसी केले नाही तर त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. त्यासाठी प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. 

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी इ केवायसी प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने इ केवायसी प्रामाणिकरण... प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत् लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना खालील प्रमाणे (ekyc) ई-केवायसी व (OTP) ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीव्दारे करण्यासाठी पर्याय पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली असून त्यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी पी.एम. किसान योजनेचा https://pmkisangovin या वेबसाईटवरील (Farmer Corner) फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपव्दारे (OTP) ओटीपी व्दारे लाभार्थ्यांना स्वत: ekyc प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केद्र (सीएससी) केद्रावरती (ekyc) ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल.

Web Title: In Latur Farmers neglect to e-KYC; 1 lakh beneficiaries without e-KYC even if the deadline expires!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.