मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा लातुरात मौन सत्याग्रह
By हणमंत गायकवाड | Published: July 24, 2023 05:13 PM2023-07-24T17:13:33+5:302023-07-24T17:13:54+5:30
मौन सत्याग्रह करण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदविण्यात आला.
लातूर : मणिपूर राज्यामध्ये मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) वतीने गांधी चौकामध्ये सोमवारी मौन सत्याग्रह करण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदविण्यात आला. पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, प्रशांत घार, बख्तावर बागवान, छायाताई चिंदे, इर्शाद तांबोळी, रेखाताई कदम यांच्या उपस्थितीत मौन सत्याग्रह झाला. या आंदोलनात कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनात समीर शेख, डी. उमाकांत, मनीषा कोकणे, कालिंदा सूर्यवंशी, सविता पवार, सुनीता सोनकांबळे, ॲड. अश्विनी अडसुळे, संगीता मगर, ॲड. शेखर हविले, इराण्णा पावले, ॲड. प्रदीप पाटील, पप्पू कासले, मुन्ना तळेकर, चंद्रशेखर कत्ते, विशाल देवकते, बरकत शेख, विशाल देवकते, बसवेश्वर रेकुळगे, फिरोज सय्यद, फिरोज पठाण, उस्मान शेख, इरफान शेख, इब्राहिम शेख, अब्दुल शेख, शाहरुख पठाण, तौसिफ शेख, अनिल विरेकर, आबा सूर्यवंशी, किरण माचिले, सचिन मेटे, राजकुमार जोशी, जितेंद्र तोडकर, विकास लांडगे, प्रवीण साळुंके, शिवराज शिंदे, आदर्श उपाध्याय आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जाळपोळीसह महिला अत्याचाराच्या घटना घडल्या असताना तेथील सरकार आणि केंद्र सरकार गप्प आहेत. कारवाई करीत नाही. याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून मणिपूर घटनेचा निषेध नोंदविला.