गस्तीवरील पोलिसांना गुंगारा, लातुरात मोबाईल शॉपफोडून कोट्यावधी रुपयांचे स्मार्टफोन लंपास

By राजकुमार जोंधळे | Published: August 28, 2023 06:03 PM2023-08-28T18:03:14+5:302023-08-28T18:04:46+5:30

 गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देत चोरांनी केले दुकान साफ

in Latur robbery in mobile shop; Expensive smartphones worth crores of rupees | गस्तीवरील पोलिसांना गुंगारा, लातुरात मोबाईल शॉपफोडून कोट्यावधी रुपयांचे स्मार्टफोन लंपास

गस्तीवरील पोलिसांना गुंगारा, लातुरात मोबाईल शॉपफोडून कोट्यावधी रुपयांचे स्मार्टफोन लंपास

googlenewsNext

लातूर : मोबाईल कंपन्याचे शो-रूम फोडून जवळपास दोन ते अडीच कोटींचा मुद्देमाल पळविल्याची घटना लातूरतील गांधी मार्केट परिसरात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकाच्या पाठिमागिल आणि गांधी चौक ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधी मार्केट येथे असलेले 'बालाजी टेलिकॉम' सेंटरच्या शटरचे कुलूप तोडून, शटर उचकटून चोरट्यानी सोमवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आत प्रवेश केला. दरम्यान, मोबाईल सो-रूममध्ये ठेवण्यात आलेली महागडी घड्याळे, विविध प्रकारची मोबाईल यासह इतर साहित्य असा जवळपास दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी मोठ्या चलाखीने लंपास केला आहे. ही घटना सकाळी सहा वाजता समोर आली. घटनास्थळी दुकान चालक, मालक आणि डीवायएसपी भागवत फुंदे आणि गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मकोडे यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी दुपारपर्यंत पंचनाम्याचे काम सुरु होते. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

हद्दीत पोलिस गस्तीवर अन तरीही चोरट्याने केली मोठी चोरी...

लातूर शहरातील विविध पोलिस5होण्याचे पोलिस रात्र गस्तीवर असतात. नेहमीप्रमाणे गांधी चौक ठाण्याचे पोलिसही रविवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान, याच पोलिसांना चोरट्यानी चकवा देत मोठी चोरी यशस्वी केली. पोलिसांना गुंगारा देत, हे दुकान चोरट्यानफोडले आहे. 

दुकान मालक तक्रारी दिल्यानंतरच समोर येणार चोरीचा खरा आकडा...

आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, चोरीला नेमका किती मुद्देमाल गेला आहे. हे दुकान मालकच सांगू शकतात. सायंकाळपर्यंततरी त्यांची तक्रार प्राप्त झाली नाही. ती तक्रार दाखल झाल्याशिवाय चोरीचा आकडाच समोर येणार नाही. प्राथमिक अंदाज म्हणून दोन ते अडीच कोटींचा आकडा समोर आला आहे, असे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मकोडे म्हणाले.

Web Title: in Latur robbery in mobile shop; Expensive smartphones worth crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.