लातुरात ईडी, केंद्र शासनाच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने
By हणमंत गायकवाड | Published: August 2, 2022 05:49 PM2022-08-02T17:49:19+5:302022-08-02T17:50:34+5:30
केंद्र सरकार ईडी व अन्य संस्थांना हाताशी धरून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना नोटीस पाठवून मालमत्तेचा हिशोब मागत आहे.
लातूर : केंद्र सरकार तसेच ईडीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी निदर्शने करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्र सरकार ईडी व अन्य संस्थांना हाताशी धरून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना नोटीस पाठवून मालमत्तेचा हिशोब मागत आहे. चौकशीचा ससेमिरा ईडीने लावला आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांना जेलमध्ये जायचे नसेल तर आमच्याकडे या, अशा ऑफर दिल्या जात आहेत. या बाबी निषेधार्ह आहेत. त्याचा शिवसेना निषेध करते, अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन झाले.
आंदोलनात युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल मातोळकर, उपजिल्हा प्रमुख विष्णू साबदे, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, महानगर संघटक योगेश स्वामी, शहर प्रमुख रमेश माळी, व्यापारी आघाडीचे जिल्हा प्रमुख बस्वराज मंगरुळे, एस.आर. चव्हाण, तानाजी करपुरे, बाबूराव शेळके, सतीश शिंदे, कालिदास मेटे, मारुती सावंत, सुनील बसपुरे, राजाभाऊ कतारे, त्रिंबक स्वामी, माधव कुलकर्णी, सिद्धेश्वर जाधव, श्रीराम कुलकर्णी, दिनेश बोरा, संदीप जाधव, दिलीप भांडेकर, राजा लाटे, महेश चांदणे, युवराज वंजारे, शिवराजप्पा मुळावकर, माधव कलमुकले, भास्कर माने, अनंत जगताप यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.