रायवाडी येथे एकाच रात्री तीन घरे फाेडली; साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: August 30, 2022 05:32 PM2022-08-30T17:32:21+5:302022-08-30T17:32:42+5:30
एकाच रात्री तीन घरे फाेडल्याने रायवाडीतील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
लातूर : चाकूर तालुक्यातील रायवाडी येथे एकाच रात्री अज्ञात चाेरट्यांनी तीन घरे फाेडून तब्बल ५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २९ ऑगस्टराेजीच्या रात्री घडली. याबाबत किनगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी ज्ञानाेबा गाेविंद मुरकुटे (वय ४० रा. रायवाडी ता. चाकूर) यांच्या घरातील किचनच्या खाेलीचे चावीने कुलूप काढून चाेरट्यांनी मुद्देमाल चाेरुन नेला. दरम्यान, याच रात्री गावातीलच बळीराम केदार यांच्या घराचे कुलूप काेंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी आत प्रवेश केला. घरात ठेवण्यात आलेले राेख ४० हजार रुपये पळविले. तर वैजनाथ तुकाराम मुरकुटे यांच्या घराच्या गेटची कडी काढून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. गाढ झाेपेत असलेल्या घरातील लाेकांना कुठलाही थांगपत्ता न लागू देता, साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख १ हजार ५०० रुपयांचा असा एकूण ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २९ ऑगस्टराेजीच्या रात्री घडली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. याबाबत किनगाव पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाेरट्यांच्या अटकेसाठी पाेलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. एकाच रात्री तीन घरे फाेडल्याने रायवाडीतील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
पाच लाखांचे दागिन्याची चाेरी...
एकाच रात्री तीन घरे फाेडून चाेरट्यांनी तब्बल ४ लाख ८० हजारांचे साेन्याचे दागिने तर चांदीचे ३३ हजारांचे दागिन्यांचा समावेश आहे. शिवाय, एकूण ५ लाख ५४ हजारांच्या मुद्देमालापैकी राेख रक्कम ४१ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे. अशी माहिती किनगाव पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी दिली.