लातुरात पुन्हा चोरटे सक्रीय; एकाच रात्री दोन दुकाने फोडली, रोकड पळविली
By राजकुमार जोंधळे | Published: September 3, 2022 12:42 PM2022-09-03T12:42:36+5:302022-09-03T12:43:26+5:30
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाढवळ्या आणि पहाटेच्या वेळी दुकान, घरे फाेडणाऱ्या टाेळ्या सक्रीय झाल्या आहेत.
लातूर : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेली दाेन दुकाने अज्ञात चाेरट्यांनी एकाच रात्री फाेडल्याची घटना घडली. चाेरट्यांनी गल्ला ताेडून राेकड पळविली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले. फिर्यादी धनंजय सूर्यकांत वराळे (वय ४२ रा. एमआयडीसी परिसरात स्लाॅट नंबर ८ लातूर) यांचे एक नंबर चाैकामध्ये कापड दुकान आहे. दरम्यान, ३१ ऑगस्टच्या रात्री ते नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद करुन घरी गेले हाेते. रात्रीच्या वेळी अज्ञात चाेरट्यानी त्यांच्या दुकानात प्रवेश करुन गल्ल्यात ठेवलेली २५ हजाराची राेकड पळविली.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत विकास तुळशीराम गाेमसाळे यांचे बार्शी मार्गावर मेडिकल दुकान असून, तेही याच रात्री चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली. यावेळी गल्ला ताेडून १० हजारांची राेकड, माेटारसायकलचे आरसी बूक, बॅकेचे चेक लंपास केले. घटनास्थळली एमआयडीसी पाेलिसांनी भेट देवून पंचनामा केला आहे. याबाबत तक्रारदाराच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फाैजदार देशमुख करत आहेत.
पुन्हा चोरटे झाले सक्रीय...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाढवळ्या आणि पहाटेच्या वेळी दुकान, घरे फाेडणाऱ्या टाेळ्या सक्रीय झाल्या आहेत. सध्याला सणासुदीचे दिवस असल्याने अनेक घरांना कुलूप असते. बंद घर, दुकान आणि आपार्टमेंटमधील फ्लॅट फाेडण्याच्या घटनात अलिकडे माेठी वाढ झाली आहे. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र, चाेरट्यांचा काही सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे.