जमिनीचा पोत टिकविण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:36 AM2021-02-28T04:36:46+5:302021-02-28T04:36:46+5:30
लातूर : कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील साई येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. ...
लातूर : कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील साई येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. जमिनीचा पोत टिकविण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश उफाडे, उपसरपंच अमोल पवार, संचालक ज्ञानेश्वर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी, कृषी सहाय्यक पल्लवी बायसठाकूर, अजय घोडके, कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे, संतोष सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. सचिन बावगे म्हणाले, जमीन सुदृढ असेल तर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ शक्य होते. जमिनीतील सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवा. यासाठी गांडूळ खत, हिरवळीचे खते, शेणखत यासारख्या निविष्ठांचा वापर वाढवा तरच आपली जमीन सुदृढ होईल, सुपीक राहील. जमिनीचा पोत टिकून राहील. कृषी पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शिवाजी पवार, माने, ग्रामसेवक आर.एस परमेश्वरे, बालासाहेब वलसे, रानबा क्षीरसागर, सुनिता पवार, मंगल पवार, शीतल पवार आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.