पावसामुळे जळकोटातील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:50+5:302021-07-23T04:13:50+5:30

जळकोट : गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात संततधार पाऊस पडत असून व या भीज पावसाने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. ...

Increase in water storage in Jalkot due to rains | पावसामुळे जळकोटातील जलसाठ्यात वाढ

पावसामुळे जळकोटातील जलसाठ्यात वाढ

Next

जळकोट : गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात संततधार पाऊस पडत असून व या भीज पावसाने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली असून, बारा ते चौदा साठवण तलाव ९० टक्के भरले आहेत. शिवारात असलेल्या उभ्या पिकांना मात्र, या पावसाचा फटका बसला असून पिके पिवळी पडत आहेत.

जळकोट तालुक्यात १३ जुलै रोजी ७५ मिमी, १४ जुलै रोजी ४० मिमी पाऊस झाला. याच तारखेला घोणसी महसूल मंडळात ८८ मिमी पाऊस पडला. तर २२ जुलैला जळकोट मंडळात ५५ मिमी, घोणसी मंडळात ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जळकोट मंडळात आतापर्यंत ५२५ तर घोणसी मंडळात ३८६ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील पावसाची सरासरी ७५० मिमी असून जुलै महिन्यातच ७५ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठा पाऊस झाला असून, जूनमध्ये वेळेवर पेरण्या झाल्या मात्र, १५ दिवस पावसाने दडी मारली होती. जळकोटला पाणीपुरवठा करणाऱ्या माळहिपरगा साठवण तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला असून, हळद वाढवणा, जंगमवाडी, वांजरवाडा, शेंडगे, सोनवळा, करंजी, डोंगर, कोनाळी, शेलदरा,धोंडेवाडी, कोणची डोमगाव, डोंगरगाव, जगळपूर या ठिकाणच्या साठवण तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे. अनेक लहान पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहेत.

पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत...

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून महसूल प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत. हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती मन्मथ किडे, जि.प.सदस्य गटनेते संतोष तिडके, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धूळशेट्टे, शिवसेना तालुकाप्रमुख संगम टाले, धर्मपाल देवशेट्टे,नगरसेवक शिवानंद देशमुख, कादर लाटवाले, रमाकांत रायवार, ॲड. तात्या पाटील, गोपाळकृष्ण गबाळे, आयुब शेख, मेहताब बेग, गोविंद केंद्रे, सुरेश चव्हाण, सत्यवान दळवे, सत्यवान पांडे, सूर्यकांत धूळशेट्टे यांनी केली आहे.

Web Title: Increase in water storage in Jalkot due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.