कृतिशील अध्यापनामुळे ज्ञान आणि कौशल्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:22+5:302021-09-26T04:22:22+5:30
राजर्षी शाहू महाविद्यालय, एआयसीटीई आणि अटल अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटॉनिक्स विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत ...
राजर्षी शाहू महाविद्यालय, एआयसीटीई आणि अटल अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटॉनिक्स विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ. अजय जाधव होते. मंचावर प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. राजू, प्रा. सदाशिव शिंदे यांची उपस्थिती होती.
डॉ. अजय जाधव म्हणाले, विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांच्या इच्छित ज्ञानवृद्धीसाठी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीमध्ये काळानुरूप बदल होत राहणे आवश्यक आहे. शिबिराचे उद्घाटन डॉ. डेव्हिड सोकोलोफ, ओरेगॉन विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात डॉ. सुवाद लेहमार, डॉ. कैलासनाथ मदनान कोची, डॉ. निषाद देशपांडे, डॉ. डी. हरनाथ, डॉ. अंचल श्रीवास्तव, डॉ. अजॉय घटक, डॉ. जुही देशमुख, डॉ. प्रमोद वाटेकर, डॉ. विपुल रस्तोगी, डॉ. अजित कुमार यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी डॉ. अभिजित यादव, डॉ. दयानंद राजे, प्रा. स्वप्निल उंडळाकर, प्रा. मारोती कुंभार, प्रा. अतुल मोरे, प्रा. विजय झाडके, प्रा. अक्षय मुंगळे, प्रा. धनंजय पालके, डॉ. महेश वावरे, डॉ. रेणुका लोंढे यांनी परिश्रम घेतले.