बेशिस्तपणा आला अंगलट, ३५० वाहनचालकांना दंड; वाहतूक शाखेची धडक कारवाई

By राजकुमार जोंधळे | Published: November 8, 2023 11:41 PM2023-11-08T23:41:42+5:302023-11-08T23:42:19+5:30

लातूर शहरातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गालगत स्थानिक नागरिकांसाठी दाेन्ही बाजूने सर्व्हिस राेडची सुविधा करण्यात आली आहे

Indiscipline 350 drivers fined; Strike action of the transport department | बेशिस्तपणा आला अंगलट, ३५० वाहनचालकांना दंड; वाहतूक शाखेची धडक कारवाई

बेशिस्तपणा आला अंगलट, ३५० वाहनचालकांना दंड; वाहतूक शाखेची धडक कारवाई

 

लातूर : रस्त्यावर मधाेमध वाहन थांबविणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे, महामार्गावरील रिंग राेडलगत असलेल्या सर्व्हिस राेडवर तासन्तास वाहने थांबविणे, रस्त्यावर अतिक्रमण करत रस्ता अडवणे आता व्यावसायिकांना अन् वाहनधारकांना चांगलेच अंगलट आले आहे. लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने अतिक्रमण करणाऱ्यांसह बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धडक कारवाईत ३५० वर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शिवाय, काही वाहनांवर थेट खटलेही दाखल करण्यात आले आहेत.

लातूर शहरातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गालगत स्थानिक नागरिकांसाठी दाेन्ही बाजूने सर्व्हिस राेडची सुविधा करण्यात आली आहे. या सर्व्हिस राेडचा वापर काही वाहनधारक, गॅरेज आणि इतर व्यावसायिकांनी वाहने उभी करण्यासाठी वापर सुरू केला आहे. याबाबत तीन महिन्यांपूर्वी लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने त्यांना नाेटिसा बजावत सक्त ताकीद देण्यात आली हाेती. दरम्यान, सर्व्हिस राेड हा स्थानिक नागरिकांसाठी असून, त्यावर वाहने थांबविण्याबराेबरच अतिक्रमण करणे हे बेकायदेशीर आहे. काही दिवसांनंतर सर्व्हिस राेडवर अतिक्रमणाबराेबरच वाहने थांबविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. परिणामी, स्थानिक नागरिक प्रमुख महामार्गावरून प्रवास करू लागल्याने अपघाताचा धाेका वाढला आहे. ही बाब वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सलग तीन दिवसांपासून धडक कारवाई माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेत मनपाचा अतिक्रमण विभागही दिमतीला आहे.

ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, बाळासाहेब केंद्रे, पाे.ना. भीमराव हासुळे, पाे.हे.काॅ. रामदास केंद्रे, पाे.हे.काॅ. लिंबराज जानकर, जग्गनाथ कांदे, ज्याेतिर्लिंग सुरवसे, धनराज मनाळे, महिला पाेलिस अनुराधा डाेंगरे, पाे. काॅ. बालाजी हरंगुळे, चालक उद्धव मुंडकर, चालक किशाेर कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

३५० चालकांवर कारवाई; अडीच लाखांचा केला दंड...

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धडक कारवाईत लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने जवळपास ३५० वर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, ताे वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे. वाहनधारकांसह व्यावसायिकांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे. - गणेश कदम, पाेलिस निरीक्षक, लातूर

Web Title: Indiscipline 350 drivers fined; Strike action of the transport department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.