निलंग्यातील ९१ गावांत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:20+5:302021-04-23T04:21:20+5:30
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य, महसूल, ...
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य, महसूल, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. कोरोना बाधित आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन हायरिस्कमधील व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात येत आहे. तसेच कोविड लसीकरणावर भर देण्यात आला आहे.
रस्त्यावर अनावश्यक फिरणा-यांना पायबंद घालण्यासाठी दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. शहरातील मुख्य चौकात पोलीस पथक ये- जा करणा-या वाहनधारकांची चौकशी करीत आहेत. तालुक्यातील निटूर, माकणी, मुगाव, पानचिंचोली, जामगा, हंगरगा, औराद शहाजानी या गावांत कोरोना बाधितांची अधिक संख्या आहे.
नियमांचे पालन करावे...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करावे. अनावश्यक घराबाहेर पडू नये. नियमितपणे मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तालुक्यात आतापर्यंत ४ हजार १४६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे ९१ जणांचा मृत्यू झाला आहे.
- डॉ. श्रीधर कदम, तालुका आरोग्य अधिकारी.
चौकट...
एकूण बाधित : ४१४६
उपचारानंतर बरे : ३१०८
ॲक्टिव्ह रुग्ण : ९७७
मयत : ९१
होम आयसोलेशन : ८००
कोविड केअर सेंटर : १४७