'त्या’ संशयितांची चौकशी सुरुच
By admin | Published: January 17, 2017 07:15 PM2017-01-17T19:15:31+5:302017-01-17T19:15:31+5:30
एका लॉजमध्ये सोमवारी नोटाबदल करुन देण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांची चौकशी मंगळवारीही सुरु असून ठोस पुरावे
Next
>ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 17 - येथील एका लॉजमध्ये सोमवारी नोटाबदल करुन देण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांची चौकशी मंगळवारीही सुरु असून ठोस पुरावे किंवा मुद्देमाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही़ संशयितांच्या चौकशीतुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असून सखोलपणे चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीसांनी दिली़.
उदगीर येथील शिवाजी चौकातील एका लॉजवर काही नागरिकांच्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भिमाशंकर हिरमुखे यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले़ रूम नं २०७ मधुन ताब्यात घेतलेल्या बीड, औरंगाबाद, आणि बार्शी येथील संशयितांची कसुन चौकशी सुरु आहे.
मंगळवारी दिवसभर चाललेल्या चौकशीत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नाही़. गाडी येत आहे, माणसे आल्यावर सांगू अशी उडवाउडवीची उत्तरे संयशित देत असल्याची माहिती पोलीसांच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली़. दरम्यान, सायंकाळपर्यंत या बाबतीत कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता़.