जिल्ह्यातील ४१० ग्रामपंचायत सदस्यांवर अपत्रातेची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: June 10, 2023 05:25 AM2023-06-10T05:25:43+5:302023-06-10T05:26:16+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही...
राजकुमार जाेंधळे, लातूर : जिल्ह्यातील एकूण ४०८ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी २०२१ राेजी मतदान झाले हाेते. दरम्यान, १८ जाेनवारी राेजी मतमाेजणी पार पडली. ग्राम पंचायतीच्या राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या उमेवारांनी त्यांच्या जातीचे वैध असलेले प्रमाणपत्र निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक हाेते. मात्र, ज्या उमेदवारांनी ते सादर केले नाही, अशा ४१० ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी शुक्रवारी जारी केले आहेत. या कारवाईने अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लातूर जिल्ह्यातील एकूण ७८६ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ४०८ ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक घेण्यात आली हाेती. या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास वर्ग या प्रवर्गातील ग्राम पंचायत उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर केले नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी अशा एकूण ४०८ ग्रामपंचायतीमधील ४१० ग्राम पंचायत सदस्यांना अपात्र ठरविले. याबाबतचे आदेश त्यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत.
जानेवारीमध्य दिलेली मुदत आली संपुष्टात...
लातूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची ठरावीत मुदत देण्यात आली हाेती. त्यांची मुदत १७ जानेवारी २०२३ राेजी संपुष्टात आली आहे. ज्यांनी दिलेल्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांवर महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कलम १० (१ अ) आणि कलम ३० (१ अ) मधील तरतुदीनुसार करवाई करण्याबाबत सूचित केल्यानुसर करण्यात आली आहे.
तालुका सदस्य संख्या
जळकाेट - १३
निलंगा - १०९
अहमदपूर - ५९
रेणापूर - ४१
उदगीर - १०९
देवणी - ७७
एकूण - ४१०