झाडासारखी सावली देत निर्भयपणे केलेले काम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:56+5:302021-08-01T04:19:56+5:30
लातूर येथे आयाेजित विभागीय सहकार उपनिबंधक श्रीकांत देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गाैरव साेहळा आणि झाडमाणूस या गाैरव ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी माजी ...
लातूर येथे आयाेजित विभागीय सहकार उपनिबंधक श्रीकांत देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गाैरव साेहळा आणि झाडमाणूस या गाैरव ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिवे यांची उपस्थिती हाेती, तर मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, कादंबरीकार शेषराव मोहिते, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष एस. आर. देशमुख, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, सत्कारमूर्ती श्रीकांत देशमुख, शालिनीताई श्रीकांत देशमुख, सहायक निबंधक अशाेक कदम, सुशांत देशमुख, मुक्ता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती हाेती. माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, झाडासारखी सावली देत श्रीकांत देशमुख यांनी अतिशय निर्भयपणे कार्य केले आहे. प्रशासनात अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढत राहिली, तर प्रशासन अधिक पारदर्शक हाेण्यासाठी लाखमाेलाची मदत हाेणार आहे. आपल्या सेवेच्या कार्यकाळात श्रीकांत देशमुख यांनी साहित्याबराेबरच प्रशासनात सकारात्मक काम केले आहे. कुठलाही भेदाभेद न करता त्यांनी माणसांना झाडासारखी सावली देत मदत केली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यात माणूसपण आणि त्यांच्या प्रश्नांना, समस्यांना त्यांनी स्थान दिले आहे. त्याचे हे कार्य प्रशासनात काम करणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे, असेही माजी मंत्री देशमुख म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले. आभार सहायक निबंधक उमेश पवार यांनी मानले.