पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:55+5:302020-12-24T04:18:55+5:30
मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत आहे. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री ...
मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत आहे. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी अहमदपूर तालुक्यातील भवनवाडी भागास भेट देऊन शेतातील तुर पिकाची पाहणी केली. सततच्या पावसामुळे बहारदार आलेले तुरीचे उभे पिक करपून गेले आहे. हवामानात बदल होवून तुरीवर खोडावरील करपा,मर आणि कोरडी मुळ कुज या रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना सांगितले.
आ. बाबासाहेब पाटील यांच्याकडून निवेदन...
या पाहणी दरम्यान अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आ. बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन तुर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी माजी आ. त्र्यंबक भिसे, दिनूनाथ चामे, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.