पर्यावरणाचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:08+5:302021-04-24T04:19:08+5:30
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांची उपस्थिती होती. डॉ.शिरफुले म्हणाले, कारोना काळात पृथ्वीवरील जैविक व अजैविक घटकावर लक्ष केंद्रित करून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. पाणी, वीज आणि ऑक्सिजन-हवा यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. हे संवर्धन केले, तरच मानवी जीवनाचे उज्ज्वल असे भवितव्य आहे. याप्रसंगी कार्यक्रम समन्वयक डॉ.कोमल गोमारे, डॉ.राहुल मोरे, प्रा.करुणा कोमटवार, उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ.जमन अनगुलवार, डॉ.रत्ना कीर्तने, प्रा.श्वेता मदने, डॉ.महेश कराळे, डॉ.रामशेट्टी शेटकार, प्रा.बनसोडे आदींसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वृक्षारोपण मोहिमेला गती देण्याचा गरज...
पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आधुनिक काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक जागृती, अपारंपरिक योग्य ऊर्जास्रोतांचा वापर, स्थानिक प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण, सोलार एनर्जी प्रकल्प उभारणे आदी उपक्रम राबविले पाहिजेत. एक जबाबदार नागरिक म्हणून एक तरी झाड लावले पाहिजे आणि निसर्गाचा समतोल साधला पाहिजे, असेही प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड म्हणाले.