आरक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:37+5:302021-07-04T04:14:37+5:30
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा आणि गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. आवश्यक ...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा आणि गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. आवश्यक त्या न्यायालयीन बाबींची पूर्तता राज्य सरकारने वेळेवर न केल्याने, न्यायालयाने तीन अटींची पूर्तता करेपर्यंत आरक्षणाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारचे धोरण आरक्षणविरोधी आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवार, ४ जुलै रोजी दुपारी १ वाजता लातूर येथे शिवाजी चौकात रास्ता रोको, जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे, जिल्हा संपर्कप्रमुख रामराव रोडे, तालुकाध्यक्ष सुदाम पांचाळ, सतीश बोडके, मल्लिनाथ पांचाळ यांनी केले आहे.