आश्वासनांची नुसतीच खैरात; शासनावर हल्ला
By Admin | Published: February 10, 2015 12:03 AM2015-02-10T00:03:56+5:302015-02-10T00:31:02+5:30
लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी, आर्थिक पॅकेज व पेट्रोल-डिझेलच्या दरात क्रुड आॅईलच्या घसरत्या किंमतीच्या प्रमाणात कपात आदी विविध मागण्यांसाठी
लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी, आर्थिक पॅकेज व पेट्रोल-डिझेलच्या दरात क्रुड आॅईलच्या घसरत्या किंमतीच्या प्रमाणात कपात आदी विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ तब्बल अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला़ यावेळी शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या़ काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक पापा मोदी यांच्या उपस्थित झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
केंद्र शासनाने दुष्काळाच्या पाहणीचा नुसता सोपस्कार केला आहे़ अद्याप केंद्राची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही़ दुष्काळामुळे शेतकरी हताश झाला असून, राज्याला केंद्राने कवडीचीही मदत केली नाही़ मदतीअभावी शेतकरी जगत आहे़ कर्जबाजारी व नापिकीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढ होत आहे़ आर्थिकदृष्ट्या शेतकरी उद्धवस्त झाला असून, शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने कसलीही तरतुद केली नाही़ राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही़ त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरला आहे, असे यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे यावेळी म्हणाले़ आंदोलनात माजी आ़वैजनाथ शिंदे, अॅड़त्र्यंबकदास झंवर, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, मोईज शेख, धनंजय देशमुख, संतोष देशमुख, नरेंद्र अग्रवाल, क्रांती नाईकवाडे, राजकुमार पाटील, सर्जेराव मोरे, रविशंकर जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस़आऱदेशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष पप्पु देशमुख, माधव गंभीरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनीज तेलाची किंमत ५० टक्के कमी झाली आहे़ परंतु भाजपाच्या केंद्र सरकारने पेट्रोल-डिजेलच्या किमतीत २० टक्के कपात केली आहे़ उरलेल्या ३० टक्क्यांचा फायदा सरकारच्या तिजोरीत भरला जात आहे़ हा प्रश्न केवळ पेट्रोल-डिजेलच्या किमतीपर्यंत मर्यादीत नसून, संधी उपलब्ध असतानाही डिजेलचे दर कमी करायला भाजपचे सरकार तयार नाही़ त्यामुळे वस्तुंचे दर आकाशाला भिडले आहेत़ लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते़ मात्र शासनाने महागाई कमी न करता तिजोरीच भरली आहे़ शेतकरी हिताच्या भूसंपादन कायद्यात सरकारने केलेले शेतकरी विरोधी बदल, भांडवलदारांसाठी कामगारांच्या अधिकारांचा बळी देणारे धोरण, एपीएल नागरीकांना स्वस्त धान्य पुरवठा, विजबिलावरील २० टक्के सवलत बंद करण्याचा निर्णय घेतले आहेत, याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले असल्याचे यावेळी अॅड़ त्र्यंबकदास झंवर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
शिवाजी चौकातील औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड तसेच शहरात गंजगोलाईकडे जाणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
४तब्बल अर्धा तास रस्तारोको आंदोलन झाले़ यामुळे चौकातील वाहतूक ठप्प झाली होती़ कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला़ त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करुन घेतली़ पोलिस व्हॅनमध्ये कार्यकर्त्यांना नेण्यात आले. यावेळी घोषणाबाजीही झाली.