तीन गावांतील मोबाईल दुकाने फोडणारा निघाला अल्पवयीन आरोपी
By राजकुमार जोंधळे | Published: November 7, 2022 07:02 PM2022-11-07T19:02:35+5:302022-11-07T19:02:48+5:30
माेबाइल दुकान फाेडणारा एकजण पाेलिसांच्या जाळ्यात
लातूर : किनगाव, चाकूर आणि अहमदपूर पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेबाइल दुकान फाेडून लाखाे रुपयांचा मुद्देमाल पळविणारा अल्पवयीन गुन्हेगार अहमदपूर पाेलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्यांच्याकडून दहा माेबाईल, माेटारसायकल आणि इतर अॅक्सेसरीज असा जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत किनगाव आणि अहमदपूर पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर ठाण्याचे अधिकारी, अंमलदार हे गस्तीवर हाेते. दरम्यान, चाकूर येथील माेबाईल दुकानात चाेरीतील एकाला मुद्देमालासह ताब्यात घेता आले. साेमवार, ७ नाेव्हेंबरराेजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एक जण रस्त्यावरुन संशयास्पद वावरताना पाेलिसांना आढळून आले. त्याला पाेलिसांनी थांबवून अधिक चाैकशी केली असता, ताे प्रश्नांची उत्तरे देताना गाेंधळून गेला. त्याला पाेलिसांनी अधिक विश्वासात घेत कसून कसून चाैकशी केली. यावेळी त्याने चाकूर येथील एक माेबाइल शाॅपी फाेडल्याचे कबूल केले. दरम्यान, चाेरलेल्या विविध कंपन्यांचे दहा माेबाईल, माेटारसायकल, अॅक्स्ेसरीज आणि लाेखंडी टाॅमी असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेला गुन्हेगार हा अल्पवयीन असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्याला पुढील तपासासाठी चाकूर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, किनगाव, अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत त्याने गुन्हे केल्याचे पाेलिसांना सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, लक्ष्मण आरदवाड यांच्या पथकाने केली.
गुन्हेगार अल्पवयीन मात्र सराईत...
पाेलिसांच्या ताब्यात असलेल्या चाेरीतील आराेपींचे वय १८ वर्षांखाली आहे. ताे वयाने अल्पवयीन आहे, मात्र सराईत गुन्हेगार असल्याचे समाेर आले आहे. चाकूर, अहमदपूर आणि किनगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने चाेरी केल्याची कबुलीही दिली आहे. अधिक तपासामध्ये इतर गुन्ह्यांचाही उलगडा हाेईल, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे.