रमेश मुलगे यांना कर्नाटका राज्योत्सव रत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:57 AM2020-12-04T04:57:20+5:302020-12-04T04:57:20+5:30
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात कन्नड विषयाच्या भरीव साहित्यनिर्मितीबाबत, तसेच कन्नड भाषा प्रचार व सेवेसाठी डॉ. मुलगे यांना हा पुरस्कार ...
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात कन्नड विषयाच्या भरीव साहित्यनिर्मितीबाबत, तसेच कन्नड भाषा प्रचार व सेवेसाठी डॉ. मुलगे यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. मुलगे यांनी कन्नड भाषेत २४ पुस्तकांचे लिखाण केले आहे. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, सोलापूरचे पुण्यश्लाेक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, म्हैसूर विद्यापीठ, संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त विद्यापीठ) या विविध ठिकाणच्या अभ्यास मंडळांवर विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
संशोधक मार्गदर्शक म्हणूनही डॉ. मुलगे काम करीत आहेत. बीदर- कन्नडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. यापूर्वीही डॉ. मुलगे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल त्यांचे स्वागत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर.के. मस्के आदींनी केले आहे.