काशिलिंगेश्वर रस्त्याचे काम अर्धवट सोडले; त्रस्त नागरिकांनी केला रास्तारोको
By राजकुमार जोंधळे | Published: October 17, 2022 06:10 PM2022-10-17T18:10:45+5:302022-10-17T18:11:24+5:30
स्थानिक नागरिकांचे सुविधाअभावी हाल होत आहेत
लातूर : शहरालगत असलेल्या काशिलिंगेश्वर ग्राम पंचायतीच्या वतीने रस्त्याचे काम सुरु करण्यात आले हाेते. मात्र, त्याला सार्वजिनक बांधकाम विभागाने आक्षेप घेतल्याने या रस्त्याचे काम बंद करण्यात आले हाेते. दरम्यान, हे काम सुरु करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संताेष नागरगाेजे यांच्या नेतृत्वाखाली आंबाजाेगाई महामार्गावर रास्ताराेकाे आंदाेलन करण्यात आले.
काशिलिंगेश्वर ग्रामपंचायतीची काही महिन्यापूर्वीच स्थापना झाली आहे. या ग्राम पंचायतीच्या हद्दीत रस्त्यांची दुरवस्था आहे. परिणामी, ग्रामपंचायतीच्यावतीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, सार्वजिनक बांधकाम विभागाने याला आक्षेप घेतला. यामुळे रस्त्याचे काम बंद पडले. याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी लातुरातील आंबाजाेगाई महामार्गावरील रेणापूर नाका परिसरात रास्ताराेकाे आंदाेलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संताेष नागरगाेजे, जिल्हा सचिव सूर्यवंशी, किरण चवहाण, मनाेज अभंगे, अंकूश शिंदे, जहाॅगीर शेख बजरंग ठाकूर, परमेश्वर पवार, चंदू केंद्र यांच्यासह कार्यकर्यांचा सहभाग हाेता. या आंदाेलनामुळे काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूक ठप्प हाेती.