बँकेतील पैसा सांभाळा, केवायसीच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:15 AM2021-07-21T04:15:18+5:302021-07-21T04:15:18+5:30

डिजिटल भामट्यांकडून प्रारंभी तुमचा माेबाइल क्रमांक शाेधून काढला जाताे. त्यानंतर तुमच्याशी गाेडी-गुलाबीने बाेलून बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा क्रमांक, ...

Keep money in the bank, fraud can happen in the name of KYC | बँकेतील पैसा सांभाळा, केवायसीच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक

बँकेतील पैसा सांभाळा, केवायसीच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक

Next

डिजिटल भामट्यांकडून प्रारंभी तुमचा माेबाइल क्रमांक शाेधून काढला जाताे. त्यानंतर तुमच्याशी गाेडी-गुलाबीने बाेलून बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा क्रमांक, माेबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक मागितला जाताे. तुम्हाला विविध याेजनेचे, अधिकच्या पैशाचे आमिष दाखविले जाते. तुमच्या खात्यात अमुक अमुक याेजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत, अशी बतावणी करून फसविले जाते. या आमिषाला बळी पडून अनेक जण आपल्या बँक खात्याशी, एमटीएमशी संबंधित माहिती देतात आणि क्षणात खात्यावरील पैसे परस्पर काढले जातात. अशा घटना माेठ्या प्रमाणावर घडत असल्याचे समाेर आले आहे.

अशी हाेऊ शकते फसवणूक...

प्रकरण - १

लातूर शहरातील एका नामांकित बँकेचे एटीएम कार्ड असलेल्या नागरिकाकडून केवायसी मागवून त्याच्या खात्यातील जवळपास ७० हजार रुपये परस्पर काढून घेतले आहेत. याप्रकरणी संबंधित पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सदर नागरिकाने सायबर सेलकडेही धाव घेतली आहे. गंडविणारा आराेपी मात्र पाेलिसांच्या हाती लागला नाही. गाेड बोलून ही माहिती अज्ञात भामट्याने मागवून घेत बँकेचे खातेच रिकामे केले.

प्रकरण - २

लातूर शहरात वास्तव्याला राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे खाते निलंगा येथील एका बँक खात्यात हाेते. दरम्यान, त्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. ही रक्कम कशी गायब झाली, याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधून चाैकशी केली असता. माहिती उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, परस्पर बँकेच्या खात्यातून पैसे लंपास करणारा भामटा हाती लागला नाही.

प्रकरण - ३

लातुरातील गंजलागाई परिसरात असलेल्या एका नामांकित बँक खात्यातून जवळपास १५ हजारांची रक्कम परस्पर गायब झाली. मी बँक खाते पाहिले असता, ही रक्कम गायब झाल्याचे आढळून आले. दरम्यान, याबाबत अधिक चाैकशी केली असता, खाते हॅक करून ही रक्क्म लंपास केली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय, सायबर सेलकडेही धाव घेतली आहे. मात्र, अज्ञात आराेपीचा शाेध अद्यापही लागला नाही.

बँकेकडून अशी विचारणाच हाेत नाही...

डिजिटल व्यवहाराचा फायदा असला तरी फसवणुकीच्या घटनाही माेठ्या प्रमाणावर हाेत आहेत. खातेदारांची बँक केवासीबद्दल माेबाइलवरून माहिती विचारत नाही. परिणामी, काेणीही अशी माहिती विचारली तर ती न देता संबंधित क्रमांकाची माहिती पाेलिसांना द्यावी. याबाबत बँकेशी संपर्क साधून खातरजमा करून घ्यावी. आमिषाला बळी पडला तर फसवणूक अटळ आहे.

ऑनलाइन गंडा घालण्याच्या घटना वाढल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये २७, जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये ४८ आणि जून २०२१ अखेर ११ फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी निनावी फाेन आणि आमिषाला बळी पडू नये. संशय आला तर पाेलिसांशी संपर्क साधावा.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

Web Title: Keep money in the bank, fraud can happen in the name of KYC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.