केंद्रेवाडी ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:10+5:302021-04-25T04:19:10+5:30
जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांच्या उपस्थितीत गावात एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा ...
जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांच्या उपस्थितीत गावात एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावेत. गावात एकत्र बसू नका, असे आवाहन केले. तसेच गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक आठवड्याला अशी फवारणी ग्रामपंचायतकडून केली जाणार आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन गावात दवंडी व ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून केले जात आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे, सरपंच ज्योती माधव केंद्रे, उपसरपंच ज्योती केंद्रे, सदस्य इंद्रायणीबाई केंद्रे, पुष्पा केंद्रे, भानुदास केंद्रे, ज्ञानोबा केंद्रे, तुकाराम केंद्रे यांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.