मातोळ्यातील खंडोबा यात्रा महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:20+5:302020-12-08T04:17:20+5:30
... जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम औसा : तालुक्यातील आलमला येथे जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आ. ...
...
जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम
औसा : तालुक्यातील आलमला येथे जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आ. अभिमन्यू पवार, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, सरपंच कैलाश निलंगेकर यांची उपस्थिती होती. फळ लागवड केलेल्या कागदी लिंबाच्या बागेला भेट देण्यात आली. सूत्रसंचालन कृषी अधिकारी एस.एन. जोशी यांनी केले.
...
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने चिंता
उदगीर : तालुक्यातील डिग्रस, सताळा, वायगाव, करवंदी, भाकसखेडा, लोहारा, कुमठा खु., जंगमवाडी, बामाजीचीवाडी, जयाबाईचीवाडी, नागोबाचीवाडी या परिसरातील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा अति पावसामुळे सोयाबीनचे अताेनात नुकसान झाले. त्यामुळे तुरीवर शेतकऱ्यांची आशा होती. वातावरणातील बदलामुळे हे पीक धोक्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. तुरीच्या उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
...
कुष्ठराेग, क्षयरुग्णांची शोधमोहीम सुरू
औसा : बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या १८ गावांमध्ये कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रुग्णांचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेस ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन हत्ते यांनी केले. ही मोहीम १६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. केंद्राअंतर्गतच्या प्रत्येक गावात दररोज २० घरांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.