खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न; फरार आराेपींच्या मुसक्या आवळल्या

By राजकुमार जोंधळे | Published: June 9, 2023 07:28 PM2023-06-09T19:28:16+5:302023-06-09T19:28:23+5:30

लातूर पाेलिसांची कारवाई : सापळा लावून दाेघांना पकडले...

Kidnapping for ransom, attempted murder; The smiles of the fugitive arrestees widened | खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न; फरार आराेपींच्या मुसक्या आवळल्या

खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न; फरार आराेपींच्या मुसक्या आवळल्या

googlenewsNext

लातूर : खंडणीच्या वसुलीसाठी एकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दाेघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लातुरातील औसा राेड परिसरात पाेलिसांनी सापळा लावत मुख्य आरोपी पंकज श्यामसुंदर पारिख, त्याचा साथीदार समीर राजासाब सय्यद यांना शुक्रवारी अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, पंकज श्यामसुंदर पारिख आणि त्याचा साथीदार राजासाब सय्यद याच्याविरोधात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. क्रमांक ०८/२०२३ कलम ३०७, ३६४ (अ), ३८६, १०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी, १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि ४, २५ शस्त्र अधिनियम कायद्यानुसार जानेवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ते गुन्हा घडल्यापासून पाेलिसांना चकवा देत फरार हाेते. त्यांच्या शाेधासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी आदेश दिले हाेते. यासाठी पाेलिस पथाकांनी विविध ठिकाणी शाेध माेहीम राबविली. 

दाेघा आराेपींनी अनेकवेळा वास्तव्याचे ठिकाण बदलले...
पोलिस आपल्या मागावर आहेत, याची कुणकुण लागल्याने ते सतत आला ठिकाणा बदलत होते. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाेलिसांनी लातुरातील औसा राेडवर खर्डेकर स्टाॅप परिसरात पाेलिसांनी सापळा लावला. यावेळी पंकज श्यामसुंदर पारिख, (वय २६, रा. भोकरंबा, ता. रेणापूर जि. लातूर), समीर राजासाब सय्यद (वय २०, रा. खाडगाव रोड, लातूर) यांच्या मुसक्या आवळल्या.

जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यात स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल...
अटकेत असलेला पंकज श्यामसुंदर पारिख याच्यावर लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, घातक अग्निशस्त्र बाळगणे, त्याचा वापर करणे आदी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर समीर राजासाब सय्यद याच्यावरही मारामारी करणे, धमक्या देणे, जबरी चोरी करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर

Web Title: Kidnapping for ransom, attempted murder; The smiles of the fugitive arrestees widened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.