किराणा व्यापा-याच्या सव्वावर्षीय बालकाचे अपहरण
By admin | Published: October 14, 2016 04:28 PM2016-10-14T16:28:45+5:302016-10-14T16:28:45+5:30
घरासमोरील अंगणात खेळणा-या एका सव्वावर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना कासारशिरसी (ता. निलंगा) येथे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कासारशिरसी, दि. १४ - घरासमोरील अंगणात खेळणा-या एका सव्वावर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना कासारशिरसी (ता. निलंगा) येथे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. दरम्यान, बालकाच्या शोधसाठी पोलिसांचे एक पथक कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यात दाखल झाले आहे.
शिवम प्रशांत बोळशेट्टे (वय १५ महिने) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. कासारशिरसी येथील किराणा व्यापारी प्रशांत बोळशेट्टे हे आपल्या कुटुंबियासमवेत बसस्थानकाजवळील गबुरे यांच्या प्लॉटमध्ये राहतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुुमारास शिवम हा रांगत घराबाहेर आला. काही वेळाने तो गायब झाला. दरम्यान, कुटुंबातील मंडळींना शिवम दिसत नसल्याचे आढळल्याने त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो सापडला नाही.
दरम्यान, कासारशिरसी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेऊन सभोवतालचा तपास केला. मात्र तो आढळला नाही. शिवमच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक तयार करून बसवकल्याण तालुक्यात पाठविले आहे. अधिक तपास एपीआय उदयसिंंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.