किल्लारी ग्रामपंचायत नगरपंचायत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:41+5:302021-07-23T04:13:41+5:30
शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष संतोश सोमवंशी, शोभाताई बेंजरगे, जयश्रीताई उटगे, राहुल मातोळकर, ...
शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष संतोश सोमवंशी, शोभाताई बेंजरगे, जयश्रीताई उटगे, राहुल मातोळकर, तालुकाप्रमुख सतीश शिंदे, उपसभापती किशोर जाधव यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष माने म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आगामी निवडणुकीची बांधणी करण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. औसा, निलंगा, उमरगा या तीन तालुक्यांतील गावांचा किल्लारी येथे संपर्क असल्यामुळे किल्लारीत शिवसेना मजबूत करा. किल्लारीची ३० हजार लोकसंख्या असून, सहा वाॅर्ड आहेत. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १७ असून, किल्लारीप्रमाणेच औराद, शिरसी येथेही नगरपरिषद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी दत्ता भोसले, विनोद बाबळसुरे, किशोर भोसले शेखर चव्हाण, रवी पिचारे, संजय उजळंबे, सहदेव कोळपे, श्रीधर साळुंके, प्रवीण कोव्हाळे, महेश सगर, मेजर किरण जाधव, अनंत जगताप, विजय पवार, तानाजी सुरवसे, आकाश कुलकर्णी, अमोल बिराजदार, शरद शिंदे, अनील वाकसे, अली बागवान, राम कदम, संजय दंडगुले, डॉ. सचिन सगर, प्रसाद भोसले, रवी जाधव, मिथुन देंडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.