किनगावचा बैल बाजार बहरला; बैल खरेदी- विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:32+5:302020-12-04T04:58:32+5:30

किनगाव हे लातूर, परभणी ,बीड जिल्ह्याच्या सिमेवर आहे. तीन जिल्ह्यांतील नागरिक दैनंदिन कामासाठी दररोज येथे ये- जा करीत असतात. ...

Kingaw's bull market flourished; Crowds of farmers buying and selling oxen | किनगावचा बैल बाजार बहरला; बैल खरेदी- विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

किनगावचा बैल बाजार बहरला; बैल खरेदी- विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

googlenewsNext

किनगाव हे लातूर, परभणी ,बीड जिल्ह्याच्या सिमेवर आहे. तीन जिल्ह्यांतील नागरिक दैनंदिन कामासाठी दररोज येथे ये- जा करीत असतात. येथे दर बुधवारी भाजीपाल्यासह पशुधनाचा बाजार भरतो. बैल खरेदी- विक्रीसाठी येथे जिल्ह्याबरोबरच परभणी, बीड येथून शेतकरी व व्यापारी येतात.

सध्या शेतीची कामे कमी प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी आले होते. दरम्यान, जनावरांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आपल्या बैलजोड्या विक्रीसाठी आणत आहेत. एका बैलजोडीची किंमत सव्वालाख ते दीड लाखांपर्यंत आहे. बुधवारी बैलजोडी खरेदीसाठी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढली आहे.

***

Web Title: Kingaw's bull market flourished; Crowds of farmers buying and selling oxen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.