क्रांतीसूर्य माने यांचा लातुरात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:33+5:302020-12-17T04:44:33+5:30
तूर पिकाची पानगळ; उत्पादनात झाली घट लातूर : जिल्ह्यात तूर पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनात ...
तूर पिकाची पानगळ; उत्पादनात झाली घट
लातूर : जिल्ह्यात तूर पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनात घट झाली असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात जवळपास १ लाख १० हजार हेक्टर्सवर तुरीचा पेरा होता. अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले. त्यामुळे तुरीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र पानगळ झाली असून, रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने तुरीचा खराटा झाला आहे.
घंटागाडीची मागणी
लातूर : लातूर शहरातील खाडगाव रोड परिसर, रिंग रोड भागात नियमित घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लाॅटवर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपाची घंटागाडी नियमित येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. स्वच्छता विभागाने घंटागाडी सुरू करून कचरा संकलन करण्याची मागणी आहे.
वाहतुकीची कोंडी
लातूर : शहरातील गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, दयानंद गेट परिसर, राजीव गांधी चौक, पाच नंबर चौक आदी भागांत सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी आहे.
शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांचा सत्कार
लातूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी शिक्षण उपसंचालक प्रभारी पदाचा पदभार स्वीकारला. त्याबद्दल जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व संस्थाचालक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश देशमुख, प्रा. बाबुराव जाधव, बजरंग चोले, तानाजी पाटील, संजय सांगवे, कालिदास शेळके, बालाजी कदम, व्यंकट किने, सूरज भिसे, शिवराज म्हेत्रे, प्रभाकर बंडगर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.