लाेकसहभाग हे शिक्षकांवरील विश्वासाचे प्रतिबिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:14+5:302021-08-01T04:19:14+5:30
तालुक्यातील सुकणी येथे शिक्षण विस्तार अधिकारी राधा येडले व मुख्याध्यापक दामोदर कानवटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...
तालुक्यातील सुकणी येथे शिक्षण विस्तार अधिकारी राधा येडले व मुख्याध्यापक दामोदर कानवटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच आशाताई कनकुरे होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य तृप्ती धुप्पे, माधव कांबळे, उपसरपंच शिवाजी सुकणे, कमलाकर मुळे, रामकिशन मुळे, धनराज मुळे, माधवराव सुकणे, विनोद गोठमुकले, शिक्षण विस्तार अधिकारी लोहकरे, सिंदाळकर, केंद्र प्रमुख बी.के. धमनसुरे, एस.टी. पाटील, के.एम. शेख, एस.पी. मुंडे, एम.झेड. लांडगे उपस्थित होते. प्रास्ताविक के.एम. शेख यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा या गावाची संपत्ती असतात. त्या जतन करण्याची जबाबदारी गावक-यांनी घेतली पाहिजे. शासन कोणतेही असले तरी त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी पुरवू शकत नाही, हे वास्तव आहे. जिल्हा परिषदेने राबविलेल्या बाला उपक्रमामुळे लोकसहभागातून शाळांचा भौतिक विकास होण्याचे श्रेय केवळ शिक्षकांचे आहे. शिक्षकांबद्दल असणारा विश्वास हाच लोकसहभागाचा मुख्य पाया आहे. काळ कितीही बदलला तरी शिक्षकांचे गौरवाचे स्थान कायम आहे. यावेळी येडले व कानवटे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रेश्मा शेख यांनी केले. आभार ज्योती सांगेवाड यांनी मानले.