तीस वर्षांनंतर लखमापूरात अवतरली लालपरी; चालक, वाहकाचा ग्रामस्थांनी केला सत्कार
By संदीप शिंदे | Published: August 5, 2023 05:25 PM2023-08-05T17:25:38+5:302023-08-05T17:26:02+5:30
बस गावात आल्याने आनंदोत्सव; विद्यार्थी, गावकऱ्यांची अडचण झाली दूर
रेणापूर : तालुक्यातील लखमापूर गावांत मागील तीस वर्षांपासून एसटी बस येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. बससाठी सरपंच ॲड. रमेश खाडप, चेअरमन प्रा. राजेसाहेब खाडप, उपसरपंच उमेशराव धायगुडे आदींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने तीस वर्षांनंतर गावात लालपरी अवतरली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
बस गावात येताच ग्रामपंचायतच्या वतीने विभागीय नियंत्रक जानराव, वाहतूक नियंत्रक अभय देशमुख यांच्यासह चालक-वाहकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन चंद्रकांत खाडप, बाळासाहेब धायगुडे, अच्युतराव खाडप, बाळकृष्ण खाडप, तातेराव खाडप, अरुण धायगुडे, अवधुत खाडप, गणेश खाडप, दत्ता धायगुडे, अनुरथ खाडप, नामदेव जाधव, नवनाथ भिसे, रघुनाथ खाडप, रघुनाथ धायगुडे, श्रीधर खाडप, भगीरथ खाडप, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक धायगुडे, आण्णासाहेब धायगुडे, गणेश खाडप, विशाल खाडप, चद्रकात धायगुडे, ओम खाडप, दगडु खाडप, तानाजी खाडप, सोमनाथ वेदपाठक, गिरीधर धायगुडे, दत्ता खाडप, गणेश धायगुडे, दत्ता खाडप, मुकुंद धायगुडे, भागवत धायगुडे, शिवाजी खाडप, बालाजी खाडप, बाळासाहेब खाडप, चंदु खाडप, मोहन धायगुडे, दिलीप खाडप, नानासाहेब खाडप, संदीपान खाडप, गोविंद सोमवंशी, कुसुमबाई धायगुडे, मिरा पांचाळ आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
निवडणूकीत दिले होते आश्वासन...
लखमापूर ग्रामपंचायतीची मागील सहा महिन्यांपुर्वी निवडणूक झाली होती. यामध्ये बस सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. विशेष म्हणजे निवडणुकीत विजय पॅनेलने चिन्ह म्हणून बस निवडली होती. त्यामुळे महामंडळाकडे पाठपुरावा करुन अखेर गावात बस सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे.