लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

By हणमंत गायकवाड | Published: April 13, 2023 06:20 PM2023-04-13T18:20:51+5:302023-04-13T18:21:21+5:30

१ हजार रिक्षा चालकांना शनिवारी होणार गणवेश वितरण

Latur city police will give uniforms to rickshaw drivres; The first initiative in the state | लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

googlenewsNext

लातूर : रिक्षा चालकांना गणवेशाची सक्ती करण्याचा विचार असतानाच लातूर शहर वाहतूक पोलिसांनी मात्र, रिक्षाचालकांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि परमिट आहे. अशा परवानाधारक रिक्षाचालकांना पहिल्या टप्प्यात १ हजार गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. 

शहर वाहतूक पोलीस शाखेने खटले दाखल करुन वाहनधारकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणुन रिक्षा चालकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक संस्थांच्या सहकाऱ्याने शहरातील १ हजार रिक्षा चालकांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला उपक्रम असेल. १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शहर वाहतूक शाखा गांधी चौक येथे ड्रेसचे वितरण होणार आहे.

यांनाच मिळेल गणवेश...
ज्या रिक्षा चालकांकडे परवाना, बॅच व रिक्षाचे परमिट आहे. अशा गरजू ॲटो चालकांना गणवेश दिला जाईल. संबधित रिक्षाचालकांनी वरील कागदपत्रे संघटनेचे पदाधिकारी अथवा लातूर शहर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेत जमा करावीत. त्यानंतर खाकी ड्रेस शनिवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिला जाणार आहे.

सामाजिक बांधिलकीचा उपक्रम...
पोलीस शाखेकडून गणवेश मिळतोय. हा सामाजिक उपक्रम आहे. महाराष्ट्रात असा पहिलाच उपक्रम असेल. वाहतूक पोलीस शाखेचे कार्य कौतूकास्पद आहे. त्यामूळे आम्हा रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे. 
- त्रिंबक स्वामी, रिक्षाचालक

Web Title: Latur city police will give uniforms to rickshaw drivres; The first initiative in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.