Latur: निलंगा येथे दाेन अपघात; पाच जण जखमी

By राजकुमार जोंधळे | Published: November 27, 2023 06:11 AM2023-11-27T06:11:26+5:302023-11-27T06:18:00+5:30

Latur: दुचाकीवरुन घराकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने जाेराची धडक दिल्याची घटना निलंगा शहरात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमरास घडला. त्यामध्ये एका मुलीसह आजी जखमी झाली आहे.

Latur: Dain accident at Nilanga; Five people were injured | Latur: निलंगा येथे दाेन अपघात; पाच जण जखमी

Latur: निलंगा येथे दाेन अपघात; पाच जण जखमी

- राजकुमार जाेंधळे
लातूर -  दुचाकीवरुन घराकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने जाेराची धडक दिल्याची घटना निलंगा शहरात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमरास घडला. त्यामध्ये एका मुलीसह आजी जखमी झाली आहे. निलंगा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून कारचालक मात्र पसार झाला आहे.

निलंगा ठाण्यातील पाेहेकाॅ. मौलाना बेग, पाेहेकाॅ. धोंडिराम कांबळे यांचे परिवार रविवारी रात्री एका कार्यक्रमासाठी गेले हाेते. दरम्यान, कार्यक्रमानंतर पोलिस वसाहतीकडे आपाल्या वाहनावरून निघाले हाेते. बेग यांची मुलगी दुचाकी चालवत होती. या दुचाकीवर कांबळे यांची आई बसली होती. दुचाकी जिजाऊ चौक परिसरात आली असता, औराद शहाजनीच्या दिशेने निघालेल्या भरगाव कारने (एम.एच. १४ बी.के. ७२०४) दुचाकीला जाेराची धडक देत सुसाट निघून गेली. या अपघातात सायमा मौलाना बेग (२२) आणि शेषाबाई झटिंग कांबळे (८५) या जखमी झाल्या असून, त्यांना निलंगा रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविले आहे. अपघातानंतर पसार झालेल्या चालकाला कारसह औराद शहाजनी पोलिसांनी पकडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शैलेश वजीर, अफरोज शेख, नाना आकडे, लतिफ शेख यांनी मदत केली.

भरधाव जीपने दुचाकीस उडविले; तिघे जखमी...
तिरुपती दर्शनावरून औशाकडे निघालेल्या भाविकांच्या जीपने निलंगा येथील एचडीएफसी बँकेसमोर दुचाकीला पाठीमागून जाेराची धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यास लातूरला हलविण्यात आले आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जगदीश सिंग सुरमकासिंग टाक (वय ४०), राजूसिंग ठाकूरसिंग टाक (३८), काशीनाथ नारायण माळी (६५ रा. निलंगा) हे तिघेही आपल्या दुचाकीवरून घराकडे जात हाेते. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या भरधाव जीपने (एम.एच. २४ व्ही. ५२३६) जाेराने उडविले. या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले. जखमींना निलंगा रुग्णालयात दाखल केले असून, राजूसिंग ठाकूरसिंग टाक यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे.

Web Title: Latur: Dain accident at Nilanga; Five people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.