दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:49 AM2019-05-10T05:49:25+5:302019-05-10T05:49:39+5:30

लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.

Latur district, 12 days to bring water to the city | दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

Next

लातूर  - लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.़ शिवाय, ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होत आहे़ जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पावर ग्रामीण भागाची मदार आहे़ मात्र या प्रकल्पात केवळ ३़७८ टक्के जलसाठा असल्याने भटकंती वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात ५८ टँकरद्वारे ४६ गावे आणि १२ वाडी-तांड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. 

गत पावसाळ्यात ६४ टक्के पाऊस झाला़ परिणामी, जानेवारीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली़ साकोळ, घरणी, रेणा, तावरजा, मसलगा, व्हटी, तिरू व देवर्जन या मध्यम प्रकल्पांपैकी आजघडीला साकोळ, घरणी आणि मसलगा या तीन मध्यम प्रकल्पांचा अपवाद वगळता पाणीपुरवठा होऊ शकत नाही़ प्रकल्प कोरडेच पडले आहेत़ १३२ लघु प्रकल्पांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे.

त्यामुळे या प्रकल्पांचाही जिल्ह्याला सध्यातरी उपयोग नाही़ शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा प्रकल्पातही १७़७१९ दलघमी मृत पाणीसाठा आहे़ जून अखेरपर्यंत या पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे़ गेल्या १५ दिवसांपासून पाणी पुरवठा आता १२ दिवसांवर आणला आहे़

पशुधनाच्या चा-याचा प्रश्न जटिल

जिल्ह्यात लहान- मोठी ७ लाख ५२ हजार पशुधनाची संख्या आहे़ ५ लाख ७२ हजार २१९ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा टंचाई जाणवत आहे़ दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे अहिंसा संघाच्या पुढाकाराने चारा छावणी सुरू करण्यात आली असून, त्यात जवळपास एक हजार जनावरे दाखल झाली आहेत़ चारा टंचाईमुळे काही शेतकरी कर्नाटकातून चारा आणत आहेत़

345 गावांत टंचाई

३४५ गावे आणि ९६ वाडी-तांड्यांना ६०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाकडे ७२ गावे व १७ वाडी-तांड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली असून त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

५ हजारच मजुरांना काम
जिल्ह्यात ५ लाख ८२ हजार नोंदणीकृत मजूर आहेत़ त्यापैकी केवळ पाच हजार मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळाली आहेत़ प्रशासनाकडून मागेल त्याला काम देण्याचा दावा आहे़ मात्र मजुरी कमी असल्याने मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली आहे.


 

Web Title: Latur district, 12 days to bring water to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.