लातूर जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; चार वर्षांत ८३९ घरफाेड्या, काेट्यवधींचा ऐवज लंपास

By राजकुमार जोंधळे | Published: January 24, 2023 07:11 PM2023-01-24T19:11:25+5:302023-01-24T19:12:13+5:30

पाेलिसांच्या हाती लागला २० टक्केच मुद्देमाल...

Latur district; In four years, 839 houses theft, crores of looted | लातूर जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; चार वर्षांत ८३९ घरफाेड्या, काेट्यवधींचा ऐवज लंपास

लातूर जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; चार वर्षांत ८३९ घरफाेड्या, काेट्यवधींचा ऐवज लंपास

googlenewsNext

- राजकुमार जाेंधळे 
लातूर :
शहरासह जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चाेरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ अखेर जिल्ह्यात चाेरट्यांनी तब्बल ८३९ घरांवर डल्ला मारला. यामध्ये राेकड, साेन्या- चांदीच्या दागिन्यांसह काेट्यवधींचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, एकूण घरफाेड्यापैकी केवळ २३६ घरफाेड्यांचा उलगडा करण्यात यश आले. मात्र, केवळ २५ टक्केच मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागल्याची माहिती समाेर आली आहे.

लातूरसह जिल्ह्यातील २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायाबराेबरच इतर गुन्ह्यांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. याला चाप लावण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी विशेष माेहीम सुरू केली आहे. शिवाय, त्या- त्या पाेलिस ठाण्यांच्या प्रमुखांना ‘ग्रुप काॅल’वर आदेशही दिले आहेत. अवैध दारू विक्री काही प्रमाणात थंडावली असली तरी घरफाेड्यांसह इतर चाेरीच्या घटना काही थांबता थांबत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

१२ काेटींच्या ऐवजावर चाेरट्यांनी मारला डल्ला...
सन २०१९ मध्ये एकूण २२८ घरफाेड्या झाल्या असून, तीन काेटी ६३ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी पळविला. २०२० मध्ये २१० घरफाेड्या झाल्या असून, दाेन काेटी ५२ लाख ३६ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला. २०२१ मध्ये १९६ घरे चाेरट्यांनी फाेडली असून, दाेन काेटी ९८ लाख ८५ हजार ५२६ रुपयांचा ऐवज लंपास केला, तर डिसेंबर २०२२ अखेर जवळपास २०५ च्या घरात घरफाेडीचा आकडा आहे. यातही सरासरी तीन काेटींच्या आसपास ऐवज चाेरट्यांनी पळविला, अशी माहिती समाेर आली आहे.

हाती लागला केवळ सव्वा काेटींचा माल...
गत चार वर्षांत जिल्ह्यात चारेट्यांनी ८३९ घरे फाेडून साेने, चांदी आणि राेकड असा जवळपास १२ काेटींवर मुद्देमाल चाेरून नेला आहे. पाेलिसांनी उघड केलेल्या २३६ घरफाेडीच्या गुन्ह्यात केवळ एक काेटी १३ लाख ७१ हजार ९९० रुपयांचाच मुद्देमाल हाती लागला आहे, तर ८० टक्के मुद्देमाल अद्यापही पाेलिसांच्या हाती लागला नाही. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी त्या- त्या ठाण्यांचे पथक प्रयत्न करत आहे.

Web Title: Latur district; In four years, 839 houses theft, crores of looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.