तब्बल सहा महिन्यानंतर लातूरला मिळाले तहसीलदार
By आशपाक पठाण | Published: October 5, 2023 02:38 PM2023-10-05T14:38:17+5:302023-10-05T14:38:17+5:30
तहसीलदार सौदागर तांदळे हे लातूर, निलंगा, तुळजापूर, पाथरीहुन आता पुन्हा लातूरला झाले रुजू
लातूर: येथील तहसील कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपासून तहसीलदार पद रिक्त असल्याने नागरिकांची ओरड वाढली. सहा महिन्यांत 4 प्रभारी नेमन्यात आले. अखेर अपेक्षेप्रमाणे लातूरला नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावून गेलेले सौदागर तांदळे हे लातूरला तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत. बुधवारी ते रुजू झाले. गुरुवारी त्यांचा विविध संघटना, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.
सौदागर तांदळे हे 2012 ते 2015 या कालावधीत लातूरला नायब तहसिलदार (महसूल), 2015 ते 2018 मध्ये निलंगा तहसील येथे पुरवठा विभागात नायब तहसीलदार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना बढती मिळाल्याने तुळजापूर येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले. 2018 ते 2022 या कालावधीत त्यांनी तुळजापूर चांगली कामगिरी केली. 2022 मध्ये त्यांची बदली परभणी जिल्ह्यातील पाथरी येते तहसीलदार म्हणून झाली होती. तेथून ते आता लातूरला तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत. मागील सहा महिन्यांपासून लातूरचे तहसीलदार पद रिक्त होते, प्रभारीवर कारभार सुरू होता.
लातूरची माहिती असलेले सौदागर तांदळे हे ऋजु झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांच्यासह कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, दुकानदार उपस्थित होते.