Latur: किराणा दुकानावरील छाप्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा

By आशपाक पठाण | Published: January 25, 2024 09:48 PM2024-01-25T21:48:40+5:302024-01-25T21:49:01+5:30

Latur News: निलंगा शहरातील शिवाजीनगर भागातील दोन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३७ हजाराचा गुटखा बुधवारी जप्त केला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur: Gutkha worth one and a half lakh seized in raid on grocery shop, case against two | Latur: किराणा दुकानावरील छाप्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा

Latur: किराणा दुकानावरील छाप्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा

- आशपाक पठाण 
निलंगा (जि.लातूर): शहरातील शिवाजीनगर भागातील दोन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३७ हजाराचा गुटखा बुधवारी जप्त केला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी सांगितले, गुटखा व सुगंधी तंबाखूवर महाराष्ट्रात बंदी असतानाही शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेशातून चोरटी वाहतूक करून शहरात सर्रास गुटखा विक्री चालू आहे. याबाबतची माहिती निलंगा पोलिसाला मिळताच बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हाडगा नाका भागातील विठ्ठल संभाजी जाधव यांचे विठ्ठल किराणा स्टोअर्स येथे छापा मारून ४५ हजार २९९ रूपयांचा विविध प्रकारच्या नमुनाच्या गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी दुकानदार फरार झाला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. गायकवाड करीत आहेत. तसेच याच भागातील अंकुश पाटील यांच्या वैष्णवी किराणा दुकानावर छापा मारला असता ९२ हजार २६५ रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त करून ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. शेजाळ हे तपास करत असून दुकानदार फरार आहे. याबाबत अन्न व भेसळ सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून वरून विठ्ठल संभाजी जाधव, अंकुश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शेजारच्या राज्यातून आवक...
निलंगा तालुक्याला लागूनच कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे बसवकल्याण, भालकी, बिदर येथून मोठ्या प्रमाणामध्ये गुटख्याची चोरटी आवक होत असते. त्यामुळे निलंगा शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. बंदी असताना गुटखा येतोच कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: Latur: Gutkha worth one and a half lakh seized in raid on grocery shop, case against two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.