Latur: पैशासाठी अपहरण करुन मारहाण; चाैघांविरुद्ध गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: October 22, 2023 11:17 PM2023-10-22T23:17:51+5:302023-10-22T23:18:42+5:30
Latur News: दिलेले पैसे व्याजासह हवेत या मागणीसाठी लातुरात अंबाजाेगाई राेडवरून एकाचे वाहनात काेंबून अपहरण करण्यात आले. त्यास बीड जिल्ह्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - दिलेले पैसे व्याजासह हवेत या मागणीसाठी लातुरात अंबाजाेगाई राेडवरून एकाचे वाहनात काेंबून अपहरण करण्यात आले. त्यास बीड जिल्ह्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी चार जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी संजय प्रभाकर थाेरात (वय ४१, रा. लक्ष्मी काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सिद्धेश्वर सुधाकर नांदे, नारायण गणेश नरनाळ, अजय शिंदे, बिभीषण डोइफोडे या चाैघांनी संगनमत करुन माझ्या भावाच्या नावावर असलेले होलसेल देशी दारु दुकान लायसन्स विक्री व्यवहारातील १४ लाख ३० हजारांपैकी १० लाख दिल्यानंतर उर्वरित पैसे देणे बाकी हाेते. हे पैसे व्याजासह हवे आहेत ? अशी मागणी करत लातुरातील अंबाजाेगाई राेडवर अंबा हनुमान मंदिरासमाेर फिर्यादीचा रस्ता अडवला. त्यांना वाहनात (एम.एच. १२ के.वाय. ८७७७) जबरदस्तीने बसवत बीड जिल्ह्यातील रुई (ता. गेवराई) येथे घेऊन गेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी, बेल्टने मारहाण करण्यात आली.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. तपास पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी.एल. निळकंठे करत आहेत.