Latur: परप्रांतीय मजुराचा मारहाणीमध्ये मृत्यू, दाेघांना पाेलिस काेठडी, लातूरनजीकची घटना
By राजकुमार जोंधळे | Published: April 3, 2024 07:06 AM2024-04-03T07:06:46+5:302024-04-03T07:07:00+5:30
Latur Crime News: मजुरी करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा वासनगाव शिवारात मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.
- राजकुमार जाेंधळे
लातूर : मजुरी करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा वासनगाव शिवारात मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, वासनगाव शिवारात समरेश श्यामसुंदर विश्वास (वय ३२, रा. धरमपूर, जि. नदिया, पश्चिम बंगाल) हा एका शेताच्या परिसरात फिरत हाेता. दरम्यान, लातुरात ताे मजुरी करत हाेता. ताे फिरत असल्याने त्याला विठ्ठल व्यंकट बाेकडे, रामेश्वर उद्धव जाधव यांनी निघून जाण्यास सांगितले. यातून बाचाबाची झाली. त्यानंतर या दाेघा शेतकऱ्यांनी त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली. मात्र, मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याचे समाेर आले. याबाबत विठ्ठल बाेकडे, रामेश्वर जाधव यांच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून, लातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी दिली.