लातूर नीट प्रकरण : संजयच्या माेबाईलमध्ये सापडले अनेक धाेगेदाेरे !
By राजकुमार जोंधळे | Published: July 8, 2024 10:50 AM2024-07-08T10:50:33+5:302024-07-08T10:50:43+5:30
सीबीआयने घेतली संजय जाधव याच्या घराची झडती
लातूर : नीटमध्ये (नॅशनल एलिजीबिलीटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दाेघांना संशयीतांना सीबीआय पथकाकडून लातूर न्यायालयाने शनिवारी हजर करण्यात आले हाेते. दरम्यान, संजय जाधव याच्या काेठडीत दाेन दिवस, ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली हाेती. सीबीआय काेठडीची मुदत आज साेमवारी संपत असून, पुन्हा त्याला लातूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय जाधव आणि जलीलखाॅ पठाण या दाेघांना अटक करण्यात आली हाेती. दरम्यान, नांदेड येथील एटीएसच्या पथकाकडून प्राथमिक तपास करण्यात आला. त्यानंतर लातूर येथील पाेलिस पथकाने तपास केला. त्यानंतर पुढील तपास सीबीआयकडे वर्ग झाल्याने ते लातुरात आठ दिवसांपासून ठाण मांडला आहे. दाेघा आराेपींना सीबीआय काेठडी मिळाल्यानंतर कसून चाैकशी करण्यात आली. सीबीआयच्या पथकाने दाेघाच्याही घरांची झडती घेतली असून माेबाईल, बॅक पासबूक आणि इतर ऐवज जप्त केला आहे. यातून गंगाधर आणि मध्यस्थ म्हणून समाेर आलेल्या इरण्णाशी असलेले संबंध, धागेदाेरे सीबीआयकडून तपासण्यात आले आहेत. संजय जाधवच्या जप्त माेबाईलमध्ये धक्कादायक खुलासे, धागेदाेरे सीबीआय पथकाच्या हाती लागले आहेत. आज साेमवारी पुन्हा जाधवला लातूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.